
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जेव्हीसी’ने केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. तेजस्वी यांनी विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह प्रशांत किशोर व चिराग पासवान यांच्यावरही मात केली आहे.



























































