
एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागा तसेच कार्यशाळा आणि बसस्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 300 मेगावॅट अर्थात सुमारे 1 हजार कोटी रुपये किंमतीच्या वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत यासाठी वापरली जाणार आहे. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
इलेक्ट्रिक बस चार्ंजगसाठी मुबलक वीज
सद्यस्थितीत एसटी महामंडळाला दैनंदिन आस्थापना वापरासाठी दरवर्षी 15 मेगावॅट इतकी वीज लागते. त्यासाठी 25 ते 30 कोटी रुपये बिल महावितरण कंपनीकडे भरावे लागते. भविष्यात येणाऱया हजारो इलेक्ट्रिक बसेसच्या चार्ंजगसाठी सुमारे 280 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. त्या बसेससाठी सौर ऊर्जेच्या माध्यमातून मुबलक वीज उपलब्ध केली जाणार आहे.
            
		





































    
    




















