
एसटी महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी किरकोळ इंधन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात एसटीच्या जागेवर 250 हून अधिक ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल-डिझेलबरोबरच सीएनजी व इलेक्ट्रिक चार्ंजग पॉइंट असलेले रिटेल विक्री कंप
सुरू केले जाणार आहेत. यामध्ये एसटी आगारांच्या सीमेवर सार्वजनिक तेल कंपन्यांच्या कंपाची व्यवस्था असणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.






























































