AI मुळेच नापास झाली, Chat gtp ने दिली चुकीची उत्तरे; प्रसिद्ध सेलिब्रिटीचा रंजक किस्सा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आल्यापासून प्रत्येक क्षेत्रात याचा वापर केला जातोय. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यत प्रत्येक जण एआयचा वापर करतोय. मात्र एआयमुळे काहींना अडचणींचा सामाना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. एका प्रसिद्ध सेलिब्रिटीला एआय वापरणे महागात पडले आहे. एआयच्या मदतीने कायद्याची परिक्षा दिली आणि त्यात नापास झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जगभरात प्रसिद्ध असलेल्या एआयवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रसिद्ध सेलिब्रिटी किम कर्दाशियान यांनी स्वत: एआयचा खुलासा केला. तिने एका मुलाखतीत कायद्याच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ओपन एआयच्या चॅटजीपीटीचा वापर केला असल्याचे सांगितले. चॅटजीपीटीने तिला सर्व चुकीची उत्तरे दिली, ज्यामुळे ती परीक्षेत नापास झाली. नंतर तिने तिची फायनल परीक्षा स्वत: अभ्यास उत्तीर्ण केली, असे तिने सांगितले.

किम कार्दशियन 2019 पासून नॉन ट्रेडिशनल प्रोग्रामच्या मदतीने कायद्याचा अभ्यास करत आहे. तिने 2021 मध्ये बेबी बार परीक्षा उत्तीर्ण केली आणि या वर्षी मे महिन्यात तिने कायद्याची पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने जुलैमध्ये बार कौन्सिल सदस्यत्वाची परीक्षा दिली. आता सध्या ती तिच्या निकालाची वाट पाहत आहे, असे वृत्त एंटरटेनमेंट वीकली ने दिले आहे.