
सोमालिया किनाऱ्यावर हिंदुस्थानातून दक्षिण आफ्रिकेकडे जाणाऱ्या एका जहाजावर मशीनगन आणि रॉकेट प्रोपेल्ड गनने सोमालियातील समुद्री चाचांनी कब्जा केला. हे जहाज हिंदुस्थानातील सिक्काहून दक्षिण आफ्रिकेच्या डरबनकडे जात असताना माल्टाचा ध्वज असलेल्या एका टँकरवर हा हल्ला करण्यात आला. याआधी सोमालियाच्या समुद्री चाचांनी एका इराणी मच्छीमारांच्या बोटीवरही कब्जा केला होता. 2011 पासून आतापर्यंत 237 घटना घडल्या आहेत.































































