
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1800 कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा भूखंड अवघ्या 300 कोटींना खरेदी केला. केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने पदरात पाडून घेतली. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापाचा आगडोंब उसळला आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. मात्र कंपनीची 99 टक्के मालकी असतानाही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. यातच आता काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या याप्रकरणी पत्र लिहिले आहे. अजित पवार यांचा सहभाग असल्याशिवाय जमीन घोटाळा होऊ शकत नाही, असे ते पत्रात म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात चंद्रकांत हंडोरे म्हणाले आहेत की, “अजित पवार यांचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नसल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महार मावळ्यांचे शौर्य पाहून वतन दिले होते. आदिवासी दलितांना त्यांच्या जमीन परत मिळवून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.




























































