
एक्स, इन्स्टाग्राम किंवा रेडीट या सोशल मीडिया साईट्सवर निळ्या साडीतील महिला व्हायरल होतेय. पाच तासांत तीन लाख लोकांनी तिला सर्च केलेय. देशभरात तिचा शोध घेतला जातोय. ही कोण आहे, असे विचारले जातेय. ही महिला दुसरी तिसरी पुणी नसून अभिनेत्री गिरिजा ओक आहे. निळ्या साडीत सोफ्यावर बसलेल्या गिरिजाच्या पह्टोला लाखो लाईक्स आणि शेअर मिळत आहेत. मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांत काम केलेली गिरिजा एकाएकी ट्रेंडिंगमध्ये आली आहे. याचे ठोस कारण समजत नाही, पण तिच्या शाळेत फिजिक्सचे शिक्षक ‘वेव्ज’ला ‘बेव्ज’ म्हणत असत. त्याचा किस्सा गिरिजाने नुकताच एका मुलाखतीत सांगितला, तेव्हापासून ती ट्रेंड होतेय.





























































