Bihar Election 2025 – शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत विक्रमी ६७.१४ टक्के मतदान; निवडणुकीचा निकाल शुक्रवारी, उमेदवारांची धाकधूक वाढली

बिहार विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या व अंतिम टप्प्याचे मतदान आज पार पडले. राज्यातील 20 जिह्यांतील 122 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बिहारच्या जनतेने विक्रमी मतदान केले. संध्याकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी ६७.१४ टक्के इतके मतदान झाले होते. तर पहिल्या टप्प्यासाठी ६५.८ टक्के मतदान झाले आहे. बिहार निवडणुकीसाठी मतमोजणी म्हणजे निकाल शुक्रवारी लागणार आहे. यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

बिहारमध्ये सत्ता बदल होऊन महाआघाडी जिंकणार की पुन्हा एनडीए सत्तेत येणार याची उत्सुकता वाढली. बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणजेच बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता असणार आहे. बिहार निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले. आणि दोन्ही टप्प्यांत विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यात ६५. ८ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६७.१४ टक्के एवढे मतदान बिहारच्या इतिहासात प्रथम झाले आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेने केले भरभरून मतदान कोणाच्या पारड्यात पडले आहे? याची उत्सुकता वाढली आहे. सत्ताधारी आणि विरोधक विजयाचे दावे करत असले तरी शुक्रवारी काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.