
खरेदीची कागदपत्रे हरवली गेली तर जास्त घाबरून जाऊ नका. सर्वात आधी मालमत्तेची मूळ कागदपत्रे हरवली आहेत, चोरीला गेली आहेत, असे नमूद करून गुन्हा दाखल करा.
पोलीस तक्रारीच्या आधारे, नुकसान झालेल्या कागदपत्रांची माहिती देणारी सूचना वर्तमानपत्रात प्रकाशित करा. हे तुमच्या मालमत्तेवर कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी महत्त्वाचे आहे.
हरवलेल्या कागदपत्रांच्या डुप्लिकेट प्रती मिळविण्यासाठी संबंधित उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधा. यासाठी गुह्याची प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
जर कागदपत्रे बँकेत सुरक्षित ठेवण्यात आली असतील आणि तेथून हरवली असतील, तर बँकेकडून नुकसानभरपाईचा दावा करू शकता.
सगळे केल्यानंतर जर तुम्हाला ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला गरज वाटल्यास कायदेशीर तज्ञाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.




























































