
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) पंपनी ओपनएआयने दिल्लीमध्ये भाडय़ाने कार्यालय घेतले आहे. पंपनीचे हे हिंदुस्थानातील पहिलेच कार्यालय आहे. चॅटजीपीटीची मूळ पंपनी ओपनएआयने या वर्षी ऑगस्टमध्ये हिंदुस्थानात कार्यालय उघडण्याची योजना जाहीर केली होती. त्या वेळी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले होते की, हिंदुस्थानात आमचे पहिले ऑफिस उघडणे आणि एक स्थानिक टीम बनवणे हे एआयला संपूर्ण देशात पोहोचवण्यासाठी पहिले खास पाऊल असणार आहे. ओपनएआयसाठी हिंदुस्थान हा अमेरिकेनंतर सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ आहे. तसेच सर्वात वेगाने वाढणाऱया बाजारपेठांपैकी एक आहे.


























































