
अमेरिकेने इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल कार्यक्रमाशी जोडलेल्या नेटवर्कवर मोठी कारवाई केली. यामध्ये हिंदुस्थानसह सात देशांतील 32 कंपन्यांवर बंदी घातली आहे. ज्या देशांवर बंदी घातली आहे, त्यामध्ये हिंदुस्थान, चीन, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिरात (यूएई), तुर्कीये, इराण आणि अन्य एका देशासह सात देशांचा समावेश आहे. हिंदुस्थानच्या फार्मलेन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा यात समावेश आहे. या कंपनीवर आरोप आहे की, या कंपनीने यूएई येथील एका फर्मसोबत मिळून सोडियम क्लोरेट आणि सोडिमयम परक्लोरेटसारखी सामग्री पोहोचवण्यास मदत केली आहे, असे अमेरिकेचे उप वित्तमंत्री जॉन के हर्ले यांनी म्हटले आहे.


























































