
कर्नाटकातील विजयपुरा, बेलगावी, बिदर आणि शिवमोग्गा या चार रेल्वे स्टेशनांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारकडून करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावानुसार, विजयपुरा रेल्वे स्टेशनचे नाव ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी रेल्वे स्टेशन, बेलगावी स्टेशनचे नाव श्री बसव महास्वामीजी रेल्वे स्टेशन, बिदर स्टेशनचे नाव चन्नबसव पट्टा देवरू स्टेशन आणि सोरागोंडानाकोप्पा स्टेशनचे नाव भयगडा रेल्वे स्टेशन करण्याचा प्रस्ताव आहे.

























































