बाजारभावापेक्षा म्हाडाची घरे महाग, चितळसरमधील घरांच्या किमती कमी करा; विजेत्यांची गृहनिर्माण मंत्र्यांसह म्हाडाकडे मागणी

म्हाडाने नुकत्याच काढलेल्या कोकण मंडळाच्या सोडतीत चितळसर मानपाडा येथील घरांचाही समावेश होता. या घरांच्या किमती याच विभागातील खासगी विकासकांच्या घरांच्या तुलनेत जास्त आहेत. एवढे पैसे घेऊन म्हाडाने येथे पार्किंग, क्लब हाऊससारख्या कोणत्या सुविधाही दिलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर चितळसर मानपाडा येथील घरांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी विजेत्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांसह म्हाडाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत गेल्या महिन्यात विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत एकूण 5,362 घरांची लॉटरी काढण्यात आली. यात अल्प उत्पन्न गटासाठी चितळसर मानपाडा येथील 869 घरांचादेखील समावेश होता. या घरांच्या किमती म्हाडाने 52 लाखांच्या आसपास ठेवल्या होत्या.

स्वस्त घराच्या संकल्पनेला हरताळ

याबाबत विजेत्यांनी सांगितले की, चितळसर मानपाडा परिसरातील ‘महावीर स्क्वेअर’ या खासगी प्रकल्पात कार पार्किंग आणि क्लब हाऊससारख्या सुविधा असूनही घराची किंमत 16,504 रुपये प्रति चौरस फूट आहे, त्या तुलनेत म्हाडाच्या घराचा दर 17,693 रुपये प्रति चौरस फूट आहे.