
विनापरवानगी रजा घेऊन कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या बिहारच्या एका जवानाचे कोर्ट मार्शल करण्यात आले. त्याला नऊ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली असून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अभय कुमार सिंह असे या जवानाचे नाव असून तो बिहार रेजिमेंटमध्ये तैनात होता. लष्करी रुग्णालयात उपचारासाठी तो गावाला गेला होता. मात्र, तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटूनही तो सेवेत परतला नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. जवानावर रजा न घेता निघून जाणे, खोटी कागदपत्रे देणे आणि शिस्तभंग करणे असे तीन आरोप होते. या जवानावर अंबाला येथील कोर्ट मार्शल विभागाने खटला चालविला होता.

























































