
आपल्याकडे मधुमेहग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढू लागली आहे. या आजाराच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण त्यांच्या आहारानुसार साखरेची पातळी चढ-उतार होते. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखर पचवू शकत नाही तेव्हा हा आजार अधिक बळावतो. यामुळे शरीराच्या नसा हळूहळू खराब होतात.
मधुमेह लवकर नियंत्रित केला नाही तर तो शरीराला कमकुवत देखील करू शकतो. हा आजार निश्चितच प्राणघातक असला तरी, निरोगी अन्न आणि व्यायामाच्या मदतीने तो नियंत्रित केला जाऊ शकतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा दावा करणारी अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत, परंतु काही निरोगी पदार्थ रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकतात.
मधुमेह लवकर नियंत्रित केला नाही तर तो शरीराला कमकुवत करू शकतो. हा आजार निश्चितच प्राणघातक असला तरी, निरोगी अन्न आणि व्यायामाने तो नियंत्रित केला जाऊ शकतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा दावा करणारी अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत.
saamana.com/make-quick-radish-paratha-for-breakfast-on-cold-days/
बीटरूट: बीटरूट हे इन्सुलिन उत्पादनाचा एक चांगला स्रोत मानले जाते. बीटरूटमध्ये आढळणारे निओ-बेटेनाइन सारखे पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिन उत्पादन वाढविण्यास मदत करतात. शिवाय फायटोकेमिकल्सने समृद्ध असलेले बीटरूट हे इन्सुलिन उत्पादनाचा एक चांगला स्रोत मानले जाते.
बीटरूटमध्ये आढळणारे निओ-बेटेनाइन सारखे पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिन उत्पादन वाढविण्यास मदत करतात. शिवाय, फायटोकेमिकल्सने समृद्ध असलेले बीटरूट, इन्सुलिन वाढवताना साखर पचवण्यास अत्यंत उपयुक्त आहे.
आरोग्य आणि चवीचा खजिना आहे ही भाजी, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे
मेथी: मेथीदाणे आणि मेथीची भाजी सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. मेथीचे पाणी नियमितपणे पिल्याने टाइप २ मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. मेथीमध्ये गॅलेक्टोमनन देखील असते, जे रक्तातील साखरेचे शोषण कमी करते.
चिया सीडस्: चिया सीडस् मध्ये कॅफिक अॅसिड मायरिसेटिन नावाचे संयुगे असतात. मधुमेहाच्या जोखमीशी लढण्यासाठी प्रभावी मानले जातात. चिया सीडस् मध्ये असंख्य पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. मधुमेहासह अनेक रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते फायदेशीर मानले जातात.
पालक: पालक हे आरोग्यासाठी रामबाण आहे. पालकात मॅग्नेशियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. या हिरव्या भाजीतील पोषक घटक मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. म्हणून, मधुमेही त्यांच्या आहारात पालकाचा समावेश करू शकतात.
बदाम: बदाम मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. मधुमेहादरम्यान बदाम खाल्ल्याने इन्सुलिनची मात्रा सुधारते. म्हणूनच मधुमेहींनी आहारामध्ये नियमितपणे बदाम खावेत.


























































