
थायलंडमध्ये सध्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धा सुरू होत आहे. मात्र, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वेगवेगळे वाद समोर येत आहेत. जगभरातील सौंदर्यवती या स्पर्धेत त्यांच्या देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. पाकिस्तानमधील रोमा रियाझ ही सौदर्यवती देखील या स्पर्धेत सहभागी होत आहे. पण स्पर्धेत सहभागी होण्याआधीच तिचा ट्रोल केलं जातंय.
रोमा रियाझ (27) ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरची रहिवासी आहे. पण ती ब्रिटनमध्ये लहानाची मोठी झाली. रोमा मॉडेलिंग देखील करते. 27 वर्षीय रोमाने थायलंडमध्ये आयोजित मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत आपले नशिब आजमवण्यासाठी मोठ्या तयारीने उतरली आहे. अशा परिस्थितीत तिच्या देशवासियांनी तिला प्रोत्साहन देणे गरजेचे असताना तिला तिच्या वर्णावरून पाकिस्तानातून ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.
View this post on Instagram
पाकिस्तानातील ट्रोलर्सनी रोमा रियाझला तिच्या रंग रुपावरून हिणवले आहे. तिचा रंग, वजन, परदेशात झालेले तिचे संगोपन आणि अगदी तिच्या धर्मावरही पाकिस्तानी ट्रोलर्स भाष्य करत आहेत. रोमा पाकिस्तानी ब्युटी क्वीनच्या साच्यात बिलकूल बसत नाही, असे एका युजरने म्हटले आहे. तुम्हाला स्पर्धेत पाठवण्यासाठी हिच मॉडेल मिळाली होती का? असेही एका युजरने म्हटले आहे
रंग, वजन यावर केलेल्या टीकेवर आता रोमाने सडेतोड उत्तर दिले आहे. याबाबत तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये ती म्हणाली की, “माझ्या रंगामुळे मी पाकिस्तानी दिसत नाही, हे मी सतत ऐकत असते. लोक माझ्या रंगावर सतत कमेंट करत असतात. काही लोकांना वाटते की माझ्या त्वचेच्या रंगामुळे मी या स्पर्धेत नसावी तर, हा रंग माझ्या देशाच्या मातीचा रंग आहे. माझा रंग आपल्या देशातील महिलांसारखाच आहे. या त्याच महिला आहेत ज्या आपलं घर सांभाळतात आणि देशाचं नाव उंचावतात, असे ती यावेळी म्हणाली.
View this post on Instagram


























































