राजा राममोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते. भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट होते असे वादग्रस्त विधान भाजप नेते इंदर सिंह परमार यांनी केले आहे. तसेच ते शिक्षणाच्या नावाखाली ते धर्मांतराचा अजेंडा राबवत होते असेही परमारम म्हणाले.

इंदर सिंह परमार म्हणाले की, राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट होते. देशभरात मिशनरी शाळा उपलब्ध होत्या, जिथे शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराचा अजेंडा राबवला जात होता. त्या काळात संथाल परगणा पर्यंत इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली या देशातील लोकांची आस्था बदलण्याचे दुष्चक्र चालू होते. यासाठी इंग्रजांनी अनेकांना भारतीय समाजसुधारक बनवले होते, ज्यात राजा राममोहन रॉय यांचाही समावेश होता. परमार यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंदर सिंह परमार पुढे म्हणाले की डॉ. भीमराव आंबेडकर अनुसूचित जाती वर्गाप्रमाणेच अनुसूचित जमाती वर्गासाठीही विशेष तरतुदी करू इच्छित होते, परंतु पंडित नेहरू यांनी ते मान्य केले नाही. यामुळे धार-झाबुआसह सर्व आदिवासी भागांमध्ये धर्मांतराची स्थिती निर्माण झाली. आता आम्ही प्रयत्न करू की अशा प्रकारची धर्मांतराची परिस्थिती निर्माण होऊ नये. मंत्री परमार यांनी माजी सरकारांवर आदिवासी नेते, खरे स्वातंत्र्यसैनिक आणि जननायक यांचा इतिहास दाबून ठेवण्याचा आरोपही केला.

देशात काही लोकांना महान ठरवून खऱ्या वीरांना विसरण्याचा प्रयत्न झाला. परंतु बिरसा मुंडा यांसारख्या क्रांतिसूर्याने मातृभूमीच्या सन्मानासाठी सर्वस्व अर्पण केले. मंत्री म्हणाले की आता दडपलेल्या खऱ्या इतिहासाशी लोकांना परिचित केले जाईल. लोकांना सत्य सांगितले जाईल. एमपीचे शिक्षण मंत्री परमार यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा इतिहासावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.