भटक्या कुत्र्यांसाठी मुंबईत युवक काँग्रेस रस्त्यावर

मुंबईतील भटक्या कुत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुलुंड येथे सोडण्यात येत असून त्याविरोधात मुंबई युवक काँग्रेस आणि प्राणीमित्र संघटनांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. निवारागृहे उभारली जात नाहीत तोपर्यंत भटक्या कुत्र्यांना मुलुंडमध्ये नेऊन मोकळ्यावर सोडू नये, अशी मागणी त्यांनी केली. निवारागृहे आणि वैद्यकीय सुविधा यांची आधी व्यवस्था करायला हवी तसेच निर्बीजीकरण कार्यक्रम तयार करायला हवा आणि त्यानंतरच ही कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.