
आज वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करून अमित शहा म्हणाले की, राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रखर पुरस्कर्ते आणि सनातन संस्कृतीचे खंदे पहारेकरी आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींच्या पुण्यतिथीस त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार.
राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात नेहमीच एखाद्या मजबूत ढालीसारख्या उभ्या राहणाऱ्या बाळासाहेबांनी आयुष्यभर संस्कृती आणि स्वधर्माच्या रक्षणासाठी संघर्ष केला. त्यांनी कधीही सिद्धांत आणि विचारसरणीशी तडजोड केली नाही. प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी ते मूल्यधारित राजकीय आयुष्याची प्रेरणा आहेत. पुण्यतिथीच्या निमित्ताने बाळासाहेबांना कोटी कोटी नमन! असे अमित शहा म्हणाले.
राष्ट्रवादी विचारधारा के प्रखर ध्वजवाहक और सनातन संस्कृति के अडिग प्रहरी आदरणीय बालासाहेब ठाकरे जी की पुण्यतिथि पर उन्हें श्रद्धापूर्वक नमन करता हूँ।
राष्ट्रविरोधी ताकतों के खिलाफ मजबूत ढाल बनकर खड़े रहने वाले बालासाहेब ठाकरे जी ने आजीवन संस्कृति और स्वधर्म की रक्षा के लिए… pic.twitter.com/J9pxuaJIAz
— Amit Shah (@AmitShah) November 17, 2025
वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या विचारांच्या मार्गावर आम्ही सातत्याने चालत राहू अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे.
वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या विचारांच्या मार्गावर आम्ही सातत्याने चालत राहू…
वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदूहृदयसम्राट बालासाहेब ठाकरे इन्होंने दिखाए विचारों के पथ पर हम हमेशा चलते रहेंगे…
(बीकेसी, मुंबई | 17-11-2025)#Maharashtra… pic.twitter.com/xcLoLYMJoi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2025
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, जननेता, हिंदुत्वाचे ओजस्वी स्वर आणि शिवसेनेचे संस्थापक आदरनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली! बाळासाहेबांनी राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडले आणि जनसेवेला जनगौरवाचे माध्यम बनवले. त्यांचे संपूर्ण जीवन धैर्य, स्पष्टवक्ता स्वभाव आणि सांस्कृतिक स्वाभिमान यांचे प्रतीक होते.
जननेता, हिंदुत्व के ओजस्वी स्वर, शिवसेना के संस्थापक आदरणीय बालासाहेब ठाकरे की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि!
बालासाहेब ने राजनीति को राष्ट्रधर्म से जोड़ा और जनसेवा को जनगौरव का माध्यम बनाया।
उनका पूरा जीवन साहस, स्पष्टवादिता और सांस्कृतिक स्वाभिमान का प्रतीक रहा। pic.twitter.com/AJp0lbT8Sz
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 17, 2025























































