
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे फिरता दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांसह शिवसैनिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. याच माध्यमातून समाजातील तळागाळातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येवर तातडीने उपचार करता यावे, यासाठी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी दक्षिण मुंबईच्या नागरिकांसाठी फिरता दवाखाना सुरू केला. आजपर्यंत हजारो रुग्णांची यातून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचार मिळाले आहेत.




























































