एक हजार रुपये दिले तर प्रशांत किशोर भेटणार

prashant-kishore

बिहार निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या जनसुराज पक्षाने आता एक नवीनच घोषणा केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांना भेटायचे असेल तर पक्षाला एक हजार रुपयांची देणगी द्यावी लागेल, अशी अट घालण्यात आली आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं, तर विरोधकांचा दारुण पराभव झाला. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षालाही बिहारच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. मात्र आता पराभवानंतर जनसुराज पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील पाच वर्षांत त्यांच्या उत्पन्नातील 90 टक्के रक्कम आता त्यांच्या पक्षाला दान करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या वेळी प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेसमोर एक नवी अट ठेवल्यामुळे चर्चा रंगली आहे.