
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आमदारकी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना या चार अक्षरी मंत्रामुळे मंत्रीपद मिळाले. तरी पक्षफोडीच्या पापात सहभागी झाले. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत पैठणकर भुमरे पिता-पुत्रांना चारी मुंड्या चित करून चांगलाच धडा शिकवणार आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. पैठण नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवल्यावर उमेदवार व शिवसैनिकांच्या प्रचार शुभारंभाच्या बैठकीत ते बोलत होते
आशिर्वाद मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रारंभी १२ प्रभागातील २५ महिला पुरुष उमेदवारांनी प्रचाराच्या पुर्वतयारीचा लेखाजोखा मांडला. यावेळी बोलताना डॉ. सुनील शिंदे म्हणाले की, आमदार खासदार यांच्या पॅनलमध्ये जनाधार नसलेले व बदनाम झालेले चार माजी नगराध्यक्ष व १७ माजी नगरसेवक यांना उमेदवारी दिली आहे. यांना सामान्य कार्यकर्ता मिळू शकला नाही. घनशक्तीच्या बळावर उभ्या केलेल्या या पॅनलला जनशक्तीची ताकद दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले. उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शहरात २४ तास पाणी दिले जाईल. असे आश्वासन दिले होते.
विलास भुमरे आमदार होऊन १२ महिने झाले. तरीही पाणीपुरवठा यंत्रणा अजूनही सक्षम झालेली नाही. न.प. च्या प्रशासकीय काळात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. याचा बदला घेऊन सत्ता बदल घडवून आणा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सुनिता आऊलवार, सुनिता देव, अविनाश कुमावत, उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. सुनील शिंदे, विधानसभा संघटक सोमनाथ जाधव, माजी तालुकाप्रमुख अरुण काळे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अपर्णा दत्ता गोर्डे, प्रभाग क्रमांक १ (अ) पोपट आडसुळ, (ब) रेणुका पठाडे, प्रभाग २ (अ) अनिल घोडके, (ब) स्नेहल धुपे, प्रभाग ३ (अ) मंगल मगरे, (ब) सचिन घुंगासे, प्रभाग ४ (अ) वैभव दहिफळे (ब) कल्पना निवारे, प्रभाग ५ (अ) निता कायस्थ, (ब जगदीश गोरडे, प्रभाग ६ (अ) मोना करकोटक, (ब) मनोज ढवळे, प्रभाग ७ (अ) रोहित हिंगे, (ब) संगिता गायकवाड, प्रभाग ८ (अ) जयकुमार पगारे, (ब) ठरताना शफीक अवघड, प्रभाग ९ (अ) दामिनी अजय परळकर, (ब) प्रल्हाद सव्वासे, प्रभाग १० (अ) कौसल्याबाई तुपे, (ब) शेख अब्बास कासम, प्रभाग ११ (अ) जयश्री गौतम बनकर, (ब) मन्नान कुरेशी, प्रभाग १२ (अ) शामशाद बेगम नुरूद्दीन वड्डे, (ब) शोभा सत्यनारायण लोहया व (क) परशुराम कमलाकर वानोळे आर्दीसह शिवसैनिकांची उपस्थिती





























































