सरसेनापती संताजी घोरपडे

संताजी म्हाळोजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात सरसेनापती होते. धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ 17 वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते. त्यांचा जन्म सांगली जिह्यातील भाळवणी येथील. एक वेळ अशी होती, राज्य नव्हते, खजाना नव्हता, सैन्यही नव्हते. त्यावेळी सरसेनापती संताजीनी हिंदवी स्वराज्याची पुर्नबांधणी केली व मराठय़ांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला. त्यांनी अनेक लढायांमध्ये शौर्य दर्शवले. त्यामुळेच ते महाराजांच्या खास मर्जीतील सरदार होते. त्यांनी औरंगजेबाच्या तुळापूर छावणीत हल्ला केला आणि छावणीचे कळस कापून नेत मोगल सैन्यात त्यांनी धडकी भरवली. कुरुंदवाड येथील पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्येश्वर महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. तसेच सातारा जिह्यातील म्हसवड गावापासून दहा किलोमीटर अंतरावर कारखेल गाव आहे. त्या गावातही समाधी आहे. परंतु निश्चितपणे कोणती समाधी अधिकृत आहे हे सांगणे हे कठीण आहे.