
दुबई येथे सुरू असलेल्या एयर शोदरम्यान हवेतील कवायती सादर करताना हिंदुस्थानी हवाई दलाचे ‘तेजस’ लढाऊ विमान कोसळले.दुर्दैवाने त्यात वैमानिक नमांल स्याल यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. या संपूर्ण घटनेनंतरही, एअर शो सुरू ठेवण्यात आला. यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली.
अमेरिकन एअर फोर्सच्या एका लढाऊ पायलट कॅप्टनने शो सुरू ठेवल्याबद्दल आयोजकांवर नाराजी व्यक्ती आहे. नमांशच्या सादरीकरणानंतर लगेचच माझे सादरीकरण होणार होते. परंतु जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मी आणि माझ्या टीमने कार्यक्रम ताबडतोब रद्द केला. मात्र आयोजकांनी शो सुरू ठेवला, असे ते म्हणाले.
या घटनेनंतर, अमेरिकन हवाई दलाचे पायलट टेलर हेस्टर यांनी सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. ही घटना त्यांच्या अंतिम टप्प्याची तयारी करत असताना घडली. आयोजकांनी जरी शो सुरू ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला असला तरी, आमच्या टीमने, इतर काही टीमसह, पायलट, त्याचे सहकारी आणि त्याच्या कुटुंबाचा आदर करण्यासाठी आमचा अंतिम परफॉर्मन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला.
टेलर पुढे म्हणाले, “या प्राणघातक अपघातानंतर आम्हाला आशा होती की शो रद्द होईल. पण तसे झाले नाही. तरीही, शो मोठ्या उत्साहात पुढे गेला. ही घटना खूपच अस्वस्थ करणारी होतीआम्हाला वाटले होते की तिथे कोणीही लोक नसतील, परंतु गर्दी उत्साही होती. आणि शो संपल्यानंतर, आयोजकांनी उत्साहाने 2027 मध्ये पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले.”असे त्यांनी सांगितले.

























































