
राजस्थान येथील चित्तौडगड (मेवाड) येथील कृष्ण धाम श्री सांवलिया सेठजी मंदिराला भाविकांनी भरभरून केलेल्या देणगीची मोजणी सुरू करण्यात आली असून अवघ्या चार फेऱ्यांच्या मोजणीत 36 कोटी 13 लाख 60 हजार रुपये मिळाले आहेत. या रकमेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. चेक, मनीऑर्डर आणि ऑनलाइन दानाची रक्कम अजून यात जोडली गेलेली नाही.























































