
हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकेतील एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी आपल्या गर्लफ्रेंडला सरकारी सुरक्षा पुरवल्याचा आरोप होत आहे. गर्लफ्रेंड एलेक्सिस विल्किंस हिला स्वॅट कमांडोची सुरक्षा पुरवल्याचा आणि सरकारी साधनांचा गैरवापर केल्याचा काश पटेल यांच्यावर आरोप आहे. काश पटेल यांनी 12 खासगी दौरे केले असून यासाठी सरकारी विमानांचाही वापर केला आहे. यामुळे सरकारी पैशांची उधळपट्टी केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. काश पटेल यांच्या या कारनाम्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात येऊ शकते, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. परंतु, ही चर्चा ट्रम्प आणि व्हाइट हाउसने फेटाळून लावली आहे.























































