
– फ्रीजमधील डीफ्रॉस्टदरम्यान तयार होणारे पाणी गोळा करणारा पॅन फुटल्यास पाणी गळते. फ्रीजच्या खालच्या मागील भागातून सर्व्हिस पॅनल काढून ड्रेन पॅन तपासा. तो फुटला असेल तर तो बदला. पाण्याच्या पाईपलाईनमध्ये भेगा पडल्यामुळे किंवा कनेक्शन सैल झाल्यामुळे गळती होते.
– जुनी किंवा खराब झालेली गॅस्केट हवा आत येण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे फ्रीजमध्ये दंव जमा होते आणि पाणी गळते. दुरुस्ती करण्यापूर्वी फ्रीज नेहमी अनप्लग करा. जर तुम्हाला खात्री नसेल किंवा समस्या गंभीर वाटत असेल, तर फ्रीज दुरुस्त करणाऱयाला घरी बोलवा. त्याच्याकडून दुरुस्त करून घ्या.


























































