
देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 चे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. हे रॉकेट खासगी अंतराळ कंपनी स्कायक्रूट एरोस्पेसने बनवले आहे.
या कॅम्पसमध्ये अनेक लॉन्च व्हेईकलच्या डिझाइन, डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन आणि टेस्टिंगचे काम केले जाईल. हा कॅम्पस तेलंगणातील हैदराबाद येथे बनवण्यात आला आहे. कंपनीचे मुख्यालयही येथेच आहे.
स्कायक्रूट एरोस्पेस कंपनीची स्थापना पवन चंदना आणि भरत ढाका यांनी 2018 मध्ये केली होती. हे दोघेही आयआयटी पदवीधर आहेत आणि इस्रोचे माजी शास्त्रज्ञ राहिले आहेत.
एकीकडे देशातील आधीच्या सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता देशातील खासगी कंपन्यांचे उद्घाटन केल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट आल्या आहेत.




























































