
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. जे लोक व्रेडिट कार्डचा वापर करतात किंवा बँकेकडून लोनसाठी अर्ज करतात, त्यांच्यासाठी आरबीआयने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यामुळे आता कर्ज घेणे आताच्या तुलनेत सोपे होणार आहे. आता देशभरात व्रेडिट स्कोअर अपडेट होण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून व्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या आता प्रत्येक आठवडय़ाला व्रेडिट स्कोअर अपडेट करतील. आतापर्यंत ही प्रक्रिया करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ लागायचा. यामुळे अनेकांना वेळेत स्कोअर अपडेट मिळत नसायचा. कर्ज किंवा व्रेडिट कार्डच्या मंजुरीत अडचणी येत होत्या, परंतु आता दर आठवडय़ाला व्रेडिट स्कोअर स्पष्ट दिसेल.
काय आहे नवीन सिस्टम?
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याच्या 7, 14, 21, 28 तारखेला आणि महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नवीन डेटा व्रेडिट कंपन्यांना पाठवणे बंधनकारक असेल. बँक महिन्याचा संपूर्ण डेटा पुढील महिन्याच्या 3 तारखेपर्यंत सीआयसीएसला पाठवतील. यानंतर आठवडय़ात होणारे अपडेट जसे, नवीन खाते उघडणे, जुने खाते बंद करणे, काही बदल, राहिलेले कर्ज यासारखे दोन दिवसांत पाठवावे लागेल. जर कोणतीही बँक वेळेत डेटा पाठवत नसेल तर संबंधित सीआयसी थेट यासंबंधी आरबीआयच्या दक्ष पोर्टलवर रिपोर्ट करतील. ही नवीन सिस्टम पूर्ण प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर कर्ज घेणाऱया आणि व्रेडिट कार्ड युजर्सला मोठा फायदा होईल. व्रेडिट कार्डधारकांनी कर्ज चुकवल्यानंतर स्कोअरमध्ये तत्काळ दिसेल. व्रेडिट स्कोअर चांगला असल्यास व्याज कमी होईल. आठवडय़ाच्या अपडेटमुळे हे सोपे होईल. बँक वेगाने अपडेट पाहू शकतील. यामुळे लिमिट वाढण्याची शक्यता आहे. हा बदल केवळ ग्राहकांसाठी नव्हे, तर बँकेसाठीही मोठी सुधारणा मानली जात आहे. बँकेकडे नवीन आणि योग्य व्रेडिट रेकाॅर्ड उपलब्ध होईल. डिफॉल्टर्सची ओळख पटकन होईल. व्रेडिट सिस्टममध्ये पारदर्शकता येईल.



























































