
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा विमान प्रवास करता यावा, म्हणून एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या मासिक पे- डे सेलची घोषणा केलेली आहे. या शानदार ऑफरमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची तिकिटे अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध झाली आहे. ही ऑफर सोमवार 1 डिसेंबरपर्यंतच आहे. एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये देशांतर्गत मार्गांसाठी तिकीट दराची सुरुवात 1850 रुपयांपासून आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी हा दर रुपये 7510 रुपयांपासून आहे.

























































