‘सेन्यार’मुळे थायलंड- मलेशियात हाहाकार

दक्षिण-पूर्व आशियामध्ये आलेल्या ‘सेन्यार’ उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस झाला असून, या महाभीषण नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण प्रदेशाला हादरवून सोडले आहे. विशेषतः इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर हाहाकार माजला आहे, जिथे 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. थायलंड आणि मलेशियातही लाखो लोक विस्थापित झाले असून, या दशकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती म्हणून याकडे पाहिले जात आहे.