
विरार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व वसई कला-क्रीडा महोत्सवाचे प्रमुख आधारस्तंभ मुकेश सावे यांचे आज पहाटे दादर येथे अल्पशः आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मुकेश सावे हे गेली 37 वर्षे वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव भरवत होते. सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले. बहुजन विकास आघाडीचे विरार नगर पालिकेचे ते पहिले नगराध्यक्ष होते. भारतीय कामगार सेनेतही त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काही काळ काम केले. त्यांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द गाजली होती. मुकेश सावे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. वाळकेश्वर बाणगंगा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.




























































