
शक्तिपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा राज्य सरकार आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महामार्गासाठी अडूनच बसले आहेत तर दुसरीकडे महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे.
हट्ट सोडा नाही तर… संघर्ष समितीचा इशारा
सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट सोडला नाही तर शेतकरी पुन्हा तीव्र आंदोलन करतील, असा इशारा समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी पत्रकाद्वारे दिला. जमीन मोजणी करायला अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी गावात पाऊल ठेवू दिले नव्हते याची आठवण पह्डणे यांनी करून दिली आहे.
महामार्ग होणारच – सीएम
शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत मार्गी लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या चंदगडमध्ये झालेल्या प्रचार सभेत जाहीरपणे म्हटले. या महामार्गामुळे रोजगार आणि उद्योगाच्या नव्या संधी तरुण पिढीला निर्माण होतील असा दावा फडणवीस यांनी केला. मात्र या निर्णयाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला.


























































