
हिंदुस्थानी लष्कराने बंगालच्या खाडीत ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईलचे यशस्वी कॉम्बॅट लाँच केले. या नव्या चाचणीमुळे आता संपूर्ण पाकिस्तान टप्प्यात आला आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही भागाला लक्ष्य केले जाऊ शकते. हलके, वेगवान आणि तितकेच घातक मिसाईल जमीन, हवा आणि समुद्रातून मारा करण्यात सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शत्रूच्या 11 एअरबेसला उद्ध्वस्त करणारी ब्रह्मोस आता हिंदुस्थानची नवी पॉवर बनली आहे. नव्या ब्रह्मोसची रेंज आता 800 किलोमीटरहून अधिक आहे.
या मिसाईलने प्रति तास 3457 वेगाने उड्डाण केले आणि दूर अंतरावर समुद्रात असलेले टार्गेट बरोबर पूर्ण केले. ब्रह्मोस मिसाईल हिंदुस्थान आणि रशिया यांचे संयुक्त प्रोजेक्ट आहे. याचे नाव ब्रह्मपुत्र नदी आणि मॉस्को नदीवरून घेण्यात आले आहे. 1998 मध्ये सुरू झालेला हा प्रोजेक्ट 2005 मध्ये हिंदुस्थानी नौदलात समावेश करण्यात आला. सुरुवातीला याची रेंज केवळ 290 किमी होती. कारण मिसाईल टेक्नोलॉजी कंट्रोल रिजीम (एमटीसीआर) च्या नियमांतर्गत 300 किमीहून जास्त रेंजची मिसाईल एक्सपोर्ट केली जाऊ शकत नव्हती. 2016 मध्ये हिंदुस्थानने एमटीसीआरमध्ये सहभागी झाल्यानंतर याची रेंज वाढवली. याआधी 450 ते 500 किमीचे एक्सटेंडेड रेंज व्हर्जन आले. जे 2017 मध्ये चाचणी करून करण्यात आले. आता 2025 मध्ये 800 किमीचे कॉम्बॅक्ट लाँग रेंज व्हर्जन आले आहे. हे मिसाईल जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीतून लाँच केले जाऊ शकते. यामुळे हिंदुस्थानचे तिन्ही सैन्य दल याचा वापर करू शकतात.
नव्या ब्रह्मोसची रेंज 800 किमी आहे. यामुळे पाकिस्तानातील कराची, लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि मुल्तान यांसारख्या भागांत लक्ष्य केले जाऊ शकते. पूर्वी तटावरून तर संपूर्ण पाकिस्तान टप्प्यात आला आहे.
जुन्या मिसाईलचे वजन 3 हजार किलो होते. नव्या मिसाईलचे वजन 1500 किलोपर्यंत आहे. यामुळे हलके लढाऊ विमान तेजसही याला घेऊन जाऊ शकते. एसयू-30 एमकेआयसारखे मोठे विमान 4 मिसाईल घेऊन जाऊ शकते.
यात मॉडिफाइड रॅमजेट इंजिन आणि जास्त फ्युअल टँक लावले आहेत. हे इंजिन हिंदुस्थानच्या डेटा पॅटर्न्स कंपनीने बनवले आहे. हे दुहेरी भूमिका बजाऊ शकते. जमिनीवर एअर बेस, कॅम्प किंवा जहाजावर हल्ला करण्यासाठी परफेक्ट आहे.

























































