एक हजार फूट उंचावरचा ग्लास स्कायवॉक खुला!

विशाखपट्टणम येथील कैलासगिरी येथे देशातील सर्वात मोठा ग्लास स्कायवॉक पर्यटकांसाठी खुला झाला आहे. यामुळे 1000 फूट उंचीवर हवेत चालण्याचा अनुभव घेता येईल. 50 मीटर लांबीचा ग्लास स्कायवॉक बांधण्यासाठी सात कोटी रुपये खर्च आला आहे. खाली डोंगरदऱया आणि त्यावरून हवेत तरंगत चालायचे. दुसऱया बाजूला बंगालच्या खाडीचे विहंगम दृश्य. काचेवर पडणारी किरणे आणि सूर्योदय-सूर्यास्ताची सुंदर फ्रेम एकूणच अद्भुत अनुभव पर्यटकांना मिळणार आहे.