
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्याचा कोर्टाचा निकाल चुकीचा आणि घटनात्मक पेच निर्माण करणारा आहे. कोर्टाला तो अधिकारच नाही, असे मत आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. यावर सर्वच राजकीय पक्षांनी लीगल सेलच्या माध्यमातून भूमिका घ्यायला हवी. जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नये, असे आंबेडकर म्हणाले.
संविधानातले कलम 243 (ओ) प्रमाणे कुठल्याही कोर्टाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हस्तक्षेप करता येत नाही, असे नमूद करताना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्वत:हून स्युमोटो पद्धतीने पुन्हा सुनावणी करून, हा निर्णय बदलावा, अशी मागणी त्यांनी केली.


























































