
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या धुरंदर या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच बॉक्सऑफिसवर धुरळा उडवला. धुरंदर पहिल्या दिवशी 15 ते 18 कोटी कमावेल अशी चित्रपट समिक्षकांनी शक्यता वर्तवली होती. मात्र हे सगळे आकडे फोल ठरवत धुरंदरने पहिल्या दिवशी 27 कोटींचा गल्ला जमवला.
धुरंदरचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट ट्रे़ंडमध्ये आहे. चित्रपटाची गाणी देखील हीट होत आहेत. 5 डिसेंबरला धुरंदर रिलीज झाला मात्र रिलीज होण्याआधीच अनेक थिएटरची अॅडवान्स बुकींग हाऊसफुल्ल झाली होती. शनिवार रविवारची देखील तिच परिस्थिती असून त्यामुळे थिएटरमालकांनी या चित्रपटाचे शो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पीवीआर, मूवी मॅक्स, एरॉस सारख्या काही थिएटर्सनी मध्य रात्री व पहाटे सहाचे देखील शो सुरू केले आहेत. या शोच्या बुकींगला देखील चांगला रिस्पॉन्स मिळत असल्याचे समजते.
अडवॉन्स्ड बुकिंग कमावले 5 कोटी
या चित्रपटाला अडवॉन्स्ड बुकिंगमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच पाच कोटींची कमाई केलेली.




























































