अलास्काजवळ भूकंपाचे धक्के, अमेरिकाही हादरली; रिश्टर स्केलवर 7.0 तीव्रतेची नोंद

अलास्का आणि कॅनडाच्या सीमेजवळ शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले, या भूकंपाचे धक्के अमेरिकेतही जाणवले आहेत. रिश्टर स्केवर ७.० तीव्रतेची नोंद करण्यात आली आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे जोरदार धक्के अलास्कार आणि कॅनडा दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या प्रदेशात जाणवले. या भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ समुद्र आहे. मात्र, सुदैवाने अद्याप कोणतीही त्सुनामीचा इशार देण्यात आलेला नाही. या भूंकपाची तीव्रता एवढी होती की अमेरिकेलाही धक्के जाणवले आहेत.

अलास्कातील जूनो शहरापासून सुमारे ३७० किलोमीटर (२३० मैल) वायव्येस आणि कॅनडाच्या युकोन प्रदेशातील व्हाइटहॉर्स शहरापासून २५० किलोमीटर (१५५ मैल) अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या ठिकाणी लोकसंख्या कमी असली तरी, भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी वस्तू पडल्याच्या घटना घडल्या. भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरलेल्या लोकांनी त्वरित सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. लोकसंख्या कमी असल्याने तीव्र भूकंप असूनही कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.