
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी हिंदुस्थानात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नाडेला यांनी याबाबत पोस्ट केली. यातून एआयसाठी पायाभूत सुविधा व काwशल्य विकसित केले जाणार आहे.
गळ्यात कापसाच्या माळा घालून विरोधकांचे आंदोलन
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी गळ्यात कापसाच्या माळा आणि हातात कापसाची रोपे घेऊन विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आंदोलनात सहभागी झाले होते. ‘आमदार मोजतात पैसे, शेतकऱ्यांना देत नाहीत पैसे, शेतकरी उपाशी… सरकार तुपाशी’, अशा घोषणा देत आमदारांनी परिसर दणाणून सोडला.



























































