
डिसेंबर महिन्यात राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढत आहे. आता येत्या आठवड्यात थंडी महाराष्ट्राला गारठवणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या जोरदार प्रवाहामुळे राज्यातील गारठा वाढत आहे. येत्या आठवड्यात उत्तरेकडून थंड वारे मोठ्या प्रमाणात वाहणार असल्याने राज्यात पुढील काही दिवसांसाठी थंडीची लाट येणार आहे. गेल्या 24 तासात राज्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे.
Cold wave conditions next 3 days in Maharashtra. Pl follow IMD updates https://t.co/tYwyO3LGCJ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 9, 2025
राज्यात येत्या आठवड्यात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहील अशी शक्यता आहे. मुंबईमध्येही पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. राज्यात 5.3 एवढे निचांकी तापमान धुळ्यात नोंदवण्यात आले आहे. उत्तरेकडून राज्यात थंडीची लाट आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे हवामान खात्याने राज्यात थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर हिंदुस्थानात सध्या थंडीची तीव्र लाट आहे.
देशभरात उत्तरेकडे थंडीची तीव्र लाट आहे. तर काही राज्यांमध्ये 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटकातील पुडुचेरी, कराईकल आणि माहे आणि अंदमान आणि निकोबार बेटांसह काही जिल्ह्यांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.






























































