
जळगाव जिल्ह्यातील जामनेर गावातील भुसावळ जामनेर दरम्यान गारखेडा शिवारात गंगापुरी जवळ भुसावळहून जामनेर साठी येणाऱ्या रिक्षा व जामनेर होऊन भुसावळकडे जाणाऱ्या मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
मिक्सर ट्रक या गाडीने पियाजो रिक्षाला जबरदस्त धडक दिली. रिक्षात एकूण आठ प्रवासी बसलेले होते त्यापैकी निकिता गोपाल निंबाळकर (राहणार चिंचखेडा बुद्रुक वय 20 ) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (तळेगाव वय 32) यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तर सरला गोपाळ निंबाळकर (वय 39 राहणार चिंचखेडा) यांचा जळगावला उपचारासाठी नेत असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला.
जयेश गोपाल निंबाळकर (वय 16 राहणार चिंचखेडा), योगेश विठ्ठल गायकवाड (राहणार चिंचखेडा वय 45), सुरेश विलास कापडे (राहणार संभाजीनगर वय 50), अखिलेश कुमार (राहणार उत्तर प्रदेश वय 50) संगीता सुभाष चौधरी (संभाजीनगर वय 50) हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.



























































