बोगस बिलाच्या मदतीने करायचे आयफोनची विक्री

 

बाजारभावापेक्षा कमी किमतीत नवीन आयफोन बोगस बिलाच्या मदतीने विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी मोहमद रमतुल्ला उजेर शेख आणि मोहम्मद ओवेस हनीफ सुमराला अटक केली. त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे आयफोन पोलिसांनी जप्त केले आहेत. शहरात काहीजणांकडे नवीन आयफोनची बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री होत आहे. या गुह्यात तीनजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.