
भरधाव वेगातील वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणाचा मृत्यू झाला. झहीर रमजान अमलानी आणि इर्शाद हुसेन अशी त्या दोघांची नावे आहेत. अपघात प्रकरणी दहिसर पोलिसांनी वाहन चालका विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
नाझमीन अमलानी या महिला मीरारोड येथे राहतात. झहीर हा त्याचा मुलगा आहे. इर्शाद आणि झहीर हे एका खासगी पंपनीत कामाला आहेत.
आज पहाटेच्या सुमारास दहिसर येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर मेट्रो स्थानक येथून ते जात होते. तेव्हा भरधाव वेगातील वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. त्या धडकेत त्याची मोटारसायकल स्लिप झाली. मोटारसायकल स्लीप झाल्याने ते दोघे खाली पडले. तेव्हा त्याच्या अंगावरून वाहन गेले. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने दहिसर पोलिसांना दिली. काही वेळात दहिसर पोलीस घटनास्थळी गेले. त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती त्या दोघांच्या पालकांना समजली. त्यानंतर त्याच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली.




























































