
मध्य प्रदेशातील इंदूरमधील भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप नेते राकेश उर्फ गोलू शुक्ला यांचा मुलाच्या लग्नात केवळ आतिषबाजी, लाईट्स यावर 70 लाखांची उधळण केली आहे. त्यामुळे हे लग्न सर्वांसाठी चर्चेचा विषय बनले होते.
गोलू शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नात आतिषबाजीवर फक्त 70 लाख रुपये खर्च केले. लग्नादरम्यान करण्यात आलेल्या भव्य आतिषबाजीने आकाश भरुन गेले होते. बराच वेळ चाललेल्या आतषबाजीने सर्वांनाच थक्क केले होते. लग्नाची सजावट, लायटिंग आणि अन्य व्यवस्था खूप शानदार होती. हा नजराणा एखाद्या सिनेमाला मागे टाकेल असाच होता. लग्न स्थळ खास पद्धतीने सजवले होते. ते पाहण्यासाठी स्थानिक लोकांबरोबर आजूबाजूचेही आले होते. अनेकजण फक्त सजावट आणि आतिषबाजी पाहायला आले होते.
मध्य प्रदेशच्या इंदूरचे आमदार गोलू शुक्ला यांचा मुलगा अंजनेश याच्या लग्नात फक्त फटाक्यांवर 70 लाख रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या लग्नातील आतिषबाजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. pic.twitter.com/Zsfiy6KxjV
— Saamana Online (@SaamanaOnline) December 16, 2025
लग्नातील आतिशबाजी आणि भव्य आयोजनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लोकं व्हिडीओ शेअर करत हे लग्न एखाद्या सिनेमातील लग्नाप्रमाणेच भव्य होते. या लग्नाबाबत आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून प्रतिक्रियाही समोर येत आहेत.



























































