
दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या वैमानिकाने एका प्रवाशाला बेदम मारहाण केली आहे. अंकित दिवान असे त्या प्रवाशाचे नाव असून त्याने कॅप्टन विरेंद्रवर गंभीर आरोप केले आहेत. विरेंद्रने अंकितला त्याच्या सात वर्षाच्या मुलीसमोर मारहाण केल्याने मुलीला मानसिक धक्का बसला आहे.
अंकितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. ”मी आणि माझे कुटुंब सिक्युरिटी चेक इन लाईनमध्ये उभे होतो तेव्हा. आमच्याकडे चार महिन्याचं बाळ असल्याने तिथल्या स्टाफने आम्हाला स्टाफसाठी असलेल्याविशेष काऊंटरवर जायला सांगितले. मी तिथे रांगेत होतो त्यावेळी विरेंद्र रांग सोडून पुढे जात होता. मी त्याला अडवलं तर त्याने अशिक्षित आहात का विचारले. ही रांग स्टाफसाठी आहे असं लिहलेलं आहे. त्यावरून आमनच्यात वाद झाला. त्यानंतर विरेंद्रने मला कानाखाली मारली. त्याने केलेल्या मारहाणीमुळे माझ्या तोंड फुटलं व रक्त आलं. ते बघून माझी सात वर्षाची मुलगी घाबरली. मारहाणीत जखमी झाल्यामुळे आम्हाला आमची ट्रीप रद्द करावी लागली.
या प्रकरणी एअर इंडियाने वैमानिकावर कडक कारवाई करत त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.




























































