वाशिममध्ये EVM मशीन बंद पडले, मतदान प्रक्रिया ठप्प

वाशिममधील प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावर EVM मशीन बंद पडल्याने गेल्या अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मतदान केंद्रा बाहेर मतदारांच्या मोठी गर्दी झाली आहे.

निवडणूक आयोगाला स्थगित कराव्या लागलेल्या अंबरनाथ, बारामतीसह राज्यातील 24 नगर पालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.

मतदान होत असलेल्या नगर पालिका आणि  नगर पंचायती

अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी आणि  नेवासा, बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची, अनगर, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री,  मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अंजनगाव सुर्जी,  बाळापूर, यवतमाळ, वाशीम, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस.

उद्या निकाल

या निवडणुकीची तसेच 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 264 नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी 10 पासून सुरू होईल.