
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ मधील निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आज (21 डिसेंबर 2025) गिरगावमधील साहित्य संघ येथे संपन्न झाला. युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेते अशोक धात्रक, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभागसंघटक युगंधरा साळेकर आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.




































































