
इराणने क्षेपणास्त्र निर्मितीचा धडाका लावला असून त्यामुळे टेन्शनमध्ये आलेला इस्रायल इराणवर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता आहे. येत्या 29 डिसेंबर रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत मोठा निर्णय होईल, असे सूत्रांकडून समजते.
काही महिन्यांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये मोठा संघर्ष झडला होता. इराणच्या आण्विक कार्यक्रमाला विरोध करत इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. अमेरिकाही नंतर या युद्धात उतरली. इराणने या दोन्ही देशांना तोडीस तोड उत्तर दिले होते. त्यानंतर अमेरिकेने एक पाऊल मागे घेत हे युद्ध थांबवले होते.

























































