
- स्नान करताना साबणाने चेहरा, हात-पाय, मान इत्यादींना नीट धुवून घेतो. मात्र. पाठीला स्वच्छ करणे कठीण होते. त्यामुळे पाठीवर घाम तसेच धुळीचा थर बसतात. त्यामुळे पाठ नीट स्वच्छ करावी.
- स्वच्छ पाठीसाठी दोन चमचे दही आणि ओट्सची पावडर याचे मिश्रण करा. ही पेस्ट पाठीवर लावा. 20 मिनिटांनी पाठ कोमट पाण्याने धुवून घ्या.
- मृत त्वचेमुळे पाठीवर डाग दिसतात. त्यासाठी संत्र्याची साल वाळवून पावडर करा आणि ती दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ती पाठीवर लावून मसाज करा. काही मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या.






















































