
देशाला कोटय़वधी रुपयांचा चुना लावून परदेशात परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावले. हिंदुस्थानात केव्हा परतणार, असा सवाल करत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने मल्ल्याच्या अर्जावर सुनावणी घेण्यास पुन्हा नकार दिला.
2016 पासून यूकेमध्ये राहणाऱया मल्ल्याने मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत, त्यापैकी एक त्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी आहे आणि दुसरी 2018 च्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. या याचिकांवर आज मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. फसवणूक आणि मनी लॉण्डरिंगच्या आरोपाखाली खटल्याला सामोरे जावे लागण्यासाठी वॉण्टेड असलेल्या मल्ल्याच्या याचिकांवर सुनावणी करताना हायकोर्टाने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांना विचारले की, तुमचे अशील हिंदुस्थानात केव्हा येणार? मल्ल्या यांनी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात स्वतःला सादर केले नाही तर आम्ही या याचिकांवर सुनावणी करणार नाही, असे हायकोर्टाने सांगितले. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मल्ल्याच्या याचिकेला विरोध करताना सांगितले की, फरार व्यक्तींना कायद्याच्या वैधतेला आव्हान देण्याची परवानगी देऊ नये तसेच मल्ल्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली प्रत्यार्पणाची कारवाई ही प्रगतीपथावर आहे. त्यावर मल






















































